धनबाद (झारखंड) :– मध्ये एका महिलेची हत्या झाली आहे. फेसबुकच्या माध्यमातून मैत्री, पुढे प्रेमप्रकरण आणि त्यातून विवाह झालेल्या या महिलेची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप आहे. या बाबत मृत महिलेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.झारखंडमधील धनबाद येथील एका 19 वर्षांच्या तरुणीची एका युवकाशी फेसबुकवर मैत्री झाली. दोघांमध्ये दीर्घकाळ संवाद सुरू होता. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मग त्या दोघांनी विवाह केला. पण विवाहानंतर काही दिवसांनी ही तरुणी अचानक गायब झाली.
रोझी परवीन असं या तरुणीचं नाव असून, तिनं मृत्यूपूर्वी तिच्या आईला फोन करून हे लोक हत्या करण्यासाठी शेतात माझा पाठलाग करत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, धनबाद येथील रोझी परवीनची बिहारमधील पश्चिम चंपारणच्या चौतरवामधील वसंतपूर सिसवा गावात हत्या करण्यात आली. ही घटना 18 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तरुणीची आई नजमा खातुनने मंगळवारी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवली.धनबाद येथील रहिवासी असलेल्या नजमा खातुन आणि मोहम्मद अन्सारी यांची कन्या रोझी परवीनची हैदराबाद येथे मजुरी काम करणाऱ्या आणि वसंतपूर सिसवा येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद शाहिदशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली.
दोघं प्रेमात पडले. त्यानंतर फेब्रुवारीत मोहम्मद शाहिद हैदराबादवरून धनबादला आला आणि तिथं भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहू लागला. यादरम्यान या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी विवाह केला.धनबाद येथे असताना शाहिद आणि रोझीच्या कुटुंबियांनी त्यांचा विवाह लावून दिला. हैदराबादमध्ये कमावलेले पैसे संपल्यावर शाहिद पैशासाठी तिचा छळ करू लागला. मी लवकरच परत येतो असं सांगत त्याने तिला तिच्या आईवडीलांकडे राहायला जाण्यास सांगितले. गावी गेल्यावर शाहिद टाळाटाळ करू लागला.
शंका वाटू लागल्याने रोझी तिच्या आईसोबत सासरी निघाली. त्यानंतर त्या बसने लौरियाला गेल्या. पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी जात असल्याचे शाहिदने त्यांना फोन करून सांगितले. तुम्ही मोतिहारीला जा. मी तुम्हाला तिथं भेटेन, असं शाहिदने सांगितले. त्यामुळे रोझी तिच्या आईसोबत मोतिहारीला पोहोचली.नजमा व रोझीसह मोतिहारी बस स्टँडवर बसल्या होत्या. त्यावेळी नजमा मुलीला सोडून बसबाबत चौकशी करण्यासाठी गेली. ती परतली तेव्हा रोझी तिथून गायब झाली होती. थोड्या वेळाने रोझीने तिच्या आईला फोन करत शाहिद आल्याचे सांगितले.
`तो मला त्याच्या गावाला घेऊन जात आहे. गावी पोहोचल्यावर मी तुझ्याशी बोलेन,असं तिनं आईला सांगितलं. 18 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिनं सांगितलं की, ‘शाहिदचे वडिल मला घरात ठेवण्यात तयार नाहीत. हे लोक हत्या करण्यासाठी शेतात माझा पाठलाग करत आहेत.` पण नजमा जेव्हा जावयाच्या घरी पोहोचली तेव्हा तेथील लोकांनी रोझी आमच्याकडे नसल्याचे सांगितले.दरम्यान, पोलीस ठाण्याचे प्रमुख संजीत कुमार यांनी या प्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले की, `नजमा यांच्या तक्रारीवरून मोहम्मद शाहिद आणि त्याचे वडील मोहम्मद आलम आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मोहम्मद शाहिदच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणलं आहे.` या लोकांनी रोझी परवीनची हत्या करून तिचा मृतदेह केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला