सिलचर (आसाम) :- मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला धुम्रपान आणि मद्यपान करण्यास भाग पाडले आहे. याबाबतचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.फोटो व्हायरल झाल्यामुळे चाईल्ड हेल्पलाईनला याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी त्या आईला ताब्यात घेतले आहे.सदर घटनेची पुष्टी आसाम ट्रिब्यून या वृत्तपत्रातून करण्यात आले आहे.
दरम्यान चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ही घटना सिलचरच्या चेंगकुरी भागात घडली. येथे एका आईने आपल्या तान्ह्या बाळाला जबरदस्तीने सिगारेट आणि दारू पिण्यास भाग पाडले. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही या घटनेची बातमी पोलिसांना दिली असून त्य़ांनी त्या आईला ताब्यात घेतले आहे.
तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताच नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. अनेक युजर्सनी या महिलेचा तीव्र निषेध केला आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी या लहान बाळाला अशा आईकडे ठेवणे चूकीचे आहे. त्याला एका चांगल्या घरात दत्तक द्या, अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला