ग्वाल्हेर (मध्य प्रदेश):- बीएसएफच्या दोन महिला कॉन्स्टेबल अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. त्या गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. बीएसएफची गुप्तचर यंत्रणा, मध्य प्रदेश पोलीस दोघींचा शोध घेत आहे. याशिवाय विशेष तपास पथकही गठीत करण्यात आलेय. बेपत्ता झाल्यापासून दोघींनी वेगवेगळया राज्यांमध्ये प्रवास केल्याचे तपासात दिसून आल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.
ग्वाल्हेर येथील टेकनपूच्या बीएसएफ अकादमीत असलेल्या 2 महिला कॉन्स्टेबल आकांशा निखार आणि शहाना खातून या 6 जूनला अत्यंत रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या. दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. बीएसएफकडून दोघी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आकांक्षा ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राहणारी आहे, तर शहाना ही पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद येथील आहे. 6 जून रोजी दोघी आपला मोबाईल हॉस्टेलमध्ये सोडून गायब झाल्या.
आकांक्षा आणि शहाना या दोघी टेकनपूच्या बीएसएफ अकादमीत 2021 पासून प्रशिक्षकपदावर आहेत. आकांक्षाच्या आईची नुकतीच ग्वाल्हेर पोलिसांनी चौकशी केली. आकांक्षाच्या आईने शहाना खातून आणि तिच्या कुटुंबाने आकांक्षाचे अपहरण केल्याचा आरोप केला.मध्य प्रदेश पोलीस पश्चिम बंगालमध्ये आकांक्षाच्या आईने शहाना खातूम, तिची बहीण आणि कुटुंबाविरोधात अपहरणाची तक्रार केली. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांची टीम पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. याशिवाय एसआयटी आणि बीएसएफचे इंटेलिजन्स युनिटदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शेवटचे लोकेशन पश्चिम बंगाल
दोघींचे शेवटचे लोकेशन ग्वाल्हेर येथे दिसले. ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघी दिसल्या. तपासातून असे दिसून आलेय की, दोघी ट्रेन पकडून दिल्लीला गेल्या. दोघींनी दिल्लीला एटीएममधून पैसेही काढले आणि नंतर कोलकात्याला रवाना झाल्या.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.