Viral Video: लग्न म्हटलं की मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. त्याशिवाय लग्नात कधी काय घडेल हेदेखील सांगता येत नाही. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अशी मजामस्ती करण्यामागे अनेकदा नवरदेवापेक्षा त्याचे मित्रच जास्त उत्साही असतात.
अनेकदा हे मित्र आपल्या नवरदेव मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर कशी मजा घेता येईल, यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसतात. तसेच काही मित्र आपल्या नवरदेव मित्रासाठी खास डान्सदेखील करतात. आता अशाच एका लग्नातील मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात नवरदेवाचे मित्र गुलाबी साडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा नवऱ्याचे मित्र हटके गिफ्ट देताना दिसतात, तर कधी लग्न सुरू असताना विचित्र विनोद करताना दिसतात.
मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर नवरदेवाचे मित्र नवऱ्यासोबत मंडपात ल्युडो खेळताना दिसले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला होता. दरम्यान, आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या मित्रांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये लग्न सुरू असलेल्या ठिकाणी अनेक पाहुणे उपस्थित आहेत.
यावेळी अचानक नवरदेवाच्या मित्रांची एंट्री होते. हे मित्र काळ्या रंगाचे कपडे घालून डोक्यावर गुलाबी ओढणी घेऊन येतात, तेवढ्यात गुलाबी साडी हे गाणं लागत आणि ते मित्र त्या गाण्यावर सुंदर डान्स करतात. या सगळ्यांचा डान्स पाहून लग्नात उपस्थित असलेली मंडळी त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात व त्यांचा व्हिडीओ काढतात, तसेच काही लोक त्यांच्याकडे पाहून हसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !