दिल्ली :- येथील रहिवासी संजय जैन यांना आपली मुलगी श्रेया जैन हिचं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं होतं. लेकीच्या लग्नाबाबत त्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. श्रेयाचं लग्न लखनौ येथे राहणाऱ्या एका तरुणासोबत ठरलं होते.डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोन्ही कुटुंब नैनितालमधील भीमतालजवळील एका रिसॉर्टमध्ये पोहोचले होते. मुलीचं लग्न असल्याने कुटुंबीय आनंदात होते. घरातील सर्व सदस्य उत्साहाने आणि आनंदाने लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमात मग्न होते.
पण अचानक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मेहंदी समारंभात नाचत असताना नवरीला हार्ट अटॅक आला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला. भीमताल येथील नौकुचियाताल जवळील एका रिसॉर्टमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे, मुलीच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रडून रडून त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या घटनेमुळे क्षणात आनंदावर विरजण पडलं आहे.
शनिवारी रात्री आपल्या मेहंदी सोहळ्यादरम्यान स्टेजवर डान्स करत असताना श्रेया अचानक बेशुद्ध पडली.श्रेया बेशुद्ध पडल्याने कुटुंबीय घाबरले. तिला तातडीने उपचारासाठी भीमतालच्या सीएचसीमध्ये नेण्यात आलं. याठिकाणी रुग्णालयात डॉक्टरांनी दीड तास मुलीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तिला वाचवता आले नाही. शेवटी तिला मृत घोषित करण्यात आलं. भिमताल पोलिसांना कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये, असं पत्र देऊन वडील लेकीचा मृतदेह घेऊन परतले आहेत.
हे पण वाचा
- हृदयद्रावक…सात जन्माचं वचन देताना नवरदेवाच्या छातीत कळ आली; लग्नाच्या विधींपूर्वीच वराने घेतला वधूच्या कुशीतच अखेरचा श्वास.
- धक्कादायक! पत्नीचे तिच्या मित्राशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भररस्त्यावर चाकूने वार करून केली पत्नीची हत्या.
- अमळनेर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.पोलिसात गुन्हा दाखल.
- शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक मध्ये तात्काळ नोंदणी करावी-शेतकरी नेते सुनील देवरे ; महाराष्ट्र शेतकरी संघटना तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणार
- एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित वही तुला