चंदीगड (हरियाणा):- आझाद नगर येथील एका घरात आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगी काजल (वय २७) बाहेर असल्याने ती बचावली. मृतांमध्ये मीना (वय ४५) आणि मुलगा राहूल (वय २३) यांचा समावेश आहे.सुरुवातीला पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्याचा संशय आला. पण, पोलिसांना हत्येचा उडगडा करण्यात यश आले आहे.काजल दुपारी चार वाजता जेव्हा मुलगी घरी आली तेव्हा आई आणि भावाचा मृतदेह पाहून धक्का बसला. मृतदेह पाहून तीने आरडाओरडा करत शेजारच्यांना याची माहिती दिली. त्यानंतर 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याची माहिती दिली. मोबाईल चार्जिंगच्या वायरने गळा आवळून या दोघांची हत्या करण्यात आली होती.
हत्याकांडाची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष म्हणजे घटनेच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुलगी काजलकडे चौकशी सुरु केली. घटना घडली त्यावेळी आपण ब्युटी पार्लरला गेलो होतो, येताना आईने मेसेज करत ज्युसची दोन पाकिटं आणण्यास सांगितले होते, अशी माहिती काजलने दिली. आईने पाठवलेला मेसेजही काजलने पोलिसांना दाखवला. हत्याकांडाच्याच दिवशी घरातील सीसीटीव्ही बंद कसा होता, ही गोष्ट पोलिसांना खटकली. त्यांना याबाबत काजलला विचारलं, पण सीसीटीव्ही कोणी आणि का बंद केला याची आपल्याला काहीच माहित नसल्याचे तीने सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली.
यात तोंडावर मास्क बांधलेला एक युवक त्यांच्या घरी जाताना आणि निघताना दिसला. विशेष म्हणजे त्यावेळी काजलही घरातच होती. घरात घुसलेला हा तरुण कोण होता? याची पोलिसांनी विचारणा केल्यावर काजल गडबडली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभव पाहिल्यानंतर पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला.काजल खोटं बोलत असल्याची पोलिसांना खात्री पटली. तिला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच काजलने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या मामेभावाला सोबत घेत काजलने आई आणि भावाची हत्या केली होती. काजल आणि मामेभाऊ कृषने मोबाईल चार्जरच्या वायरने आधी राहुलची नंतर आई मीनाची गळा आवळून हत्या केली. कृषने चार्जने गळा आवळला तर काजलने त्यांचे पाय पकडले.
त्यानंतर चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे भासवण्यासाठी त्याने घरातील साहित्य विखरले. हत्याकांडाच्या आधी काजलने घरातील सीसीटीव्ही बंद केला होता. काजल समलैंगिक होती, तिचं एका मुलीबरोबर समलैंगिक संबंध होते. एकत्र राहाता यावे यासाठी काजलने पुढाकार घेत त्या मुलीचे भाऊ राहुलबरोबर लग्न ठरवले. पण राहुलला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने हे लग्न मोडले. यावरुन काजल हिचे आई मीना आणि भावाबरोबर भांडणं वाढू लागली. दररोजच्या भांडणांना कंटाळून काजलने दोघांच्या हत्येचा कट रचला. यात तीने मामेभाऊ कृषलाही सहभागी करुन घेतले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
हत्येनंतर ब्यूटी पार्लरला गेली काजल
काजलला आई आणि भावाला मारल्याचा कुठलाही पश्चाताप नाही. हत्याकांडानंतर काजल घरात ठेवलेले १४ लाख रुपयांचे दागिने स्कूटीत घालून बाहेर पडली. ती परिसरात फिरत होती. त्यानंतर ब्यूटी पार्लरलाही गेली. जेव्हा पोलीस घरी पोहचले, तेव्हा लुटीमुळे ही घटना घडल्याची चर्चा झाली तेव्हा ती परत आली. ज्यूस घ्यायला बाहेर गेलेली असं तिने पोलिसांना सांगितले.
VIP नवाब नावानं इन्स्टाग्रामवर अकाऊंट
एका मोबाईल शॉपवर सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या काजलचे नेहमी आईसोबत वाद व्हायचे. काही महिन्यापूर्वी काजल घर सोडून गेली होती. आईने समजवल्यानंतर ती माघारी आली. काजल व्हिआयपी नवाब नावाने इन्स्टा अकाऊंट चालवायची, त्यावर रिल्स बनवून शेअर करायची.
हे पण वाचा
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.
- प्रसूतीसाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेच्या तडफडून मृत्यू; पोटातील बाळही दगावले.
- खळबळजनक! शिक्षक दाम्पत्याने मुलीसह रेल्वे रुळावर झोपून संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव झाले सुन्न.
- नातेवाईकांकडे लग्नासाठी जात असलेल्या होंडा सिटी कारला भरधाव वेगाने येत असलेल्या ऑडी कारने धडक दिल्याने सुरत येथील दाम्पत्य ठार
- घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ जळगाव शहर व तालुका सभा संपन्न