अमळनेर :- येथील सुनील मधुकर पाटील (वय -41) या तरुणाने आज ता. 18 रोजी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली. सुनील पाटील हा श्रीराम मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहत होता. त्या घराला लागत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओट्यावरील संडास मध्ये जात दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनील पाटील यांनी रात्री गळफास घेतला होता.
सकाळी मुले उठल्यावर त्यांच्या वडिलांना शोधायला लागल्यावर त्यानी गावात नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केली. मात्र आज दुपारपर्यंत सुनील मुलांना त्याच्या भावाला कुठेच दिसून आला नाही. जिल्हा बँकेत दुपारी कर्मचारी प्रसाधन गृहात गेल्यावर सुनील याने फासी घेतल्याचे दिसून आले. सुनील पाटील यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. स्वतः हातावार स्वयंपाक करून खाऊ घालत होता. त्याच्यावर कर्ज झाल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
शेती व मजुरी तो करीत होता. नापीकी व बचत गटाचे कर्ज यामुळे तो नैराश्यात होता. मुलांचे आई व वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांचा आक्रोश मनाला हेलावाणारा होता. ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविछेदन केले. नारायण पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील पाटील यांच्यावर सायंकाळी साडे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पच्यात आई वडील, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






