छत्रपती संभाजीनगर : परधर्मीयातील तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून जवळच्यांनीच मुलीवर पाळत ठेवली. मुलगी तरुणासोबत बोलताना दिसताच दोघांना पकडून मारहाण सुरू केली. तर सोबतच्या टवाळखोरांनी तरुणाला मारहाण करून जखमी केले.मंगळवारी दुपारी लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेवर ही घटना घडली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे २० ते २२ वर्षीय तरुणी शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाजवळून जात होती. त्याच दरम्यान तिला आकाश नावाचा मित्र भेटला. ते दोघे तेथे गप्पा मारत असतानाच अचानक एका अंदाजे ४० ते ५० वयोगटातील इसमाने त्यांच्याकडे जात मुलीवर हात उगारला. काही क्षणांतच जवळपास ५० ते ८० जणांचा जमाव त्या दिशेने धावत गेला. त्यांना पाहून मुलीने आकाशला पळून जाण्यास सांगितले. मात्र, जमावाने पाठलाग करून पकडले.
तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव तरुणाच्या मागे लागला. लेबर कॉलनीतील मोकळ्या जागेवर नेत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मुलगी त्याला न मारण्यासाठी जमावाला विनवण्या करत होती. मात्र जमावाने तरुणाला मारहाण सुरूच ठेवली. काही जणांनी तरुणीला दूर नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेथूनच मुलाला शाळेतून घेऊन घरी जाणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने जमावाला सुनावून मुलीला हात न लावण्याची तंबी दिली. पण जमाव तरुणाच्या मागे धावत गेल्याने मोठा धिंगाणा झाला.
पोलिस येताच टवाळखोर पळाले
घटनेला गंभीर वळण मिळण्याची शक्यता दिसताच स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. पोलिस आल्याचे दिसताच टवाळखोरांनी पळ काढला. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, निरीक्षक निर्मला परदेशी यांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मारहाण झालेल्या तरुणासह तरुणीचाही शोध सुरू होता. त्यांचा शोध लागल्यास त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जाईल. अन्यथा पाेलिस स्वत: गुन्हा दाखल करून टवाळखोरांचा शोध घेतील, असे बगाटे यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……