उत्राण ता एरंडोल (प्रतिनिधी)
गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि किर्तिवंतांसोबत सदैव कौतुकाचा हात या संकपनेतून शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य आणि धार्मिक यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांकडून विविध प्रकारच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था प्रस्ताव मागवित असून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर पुरस्काराचे वितरण जळगाव येथील अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार असून. सदर प्रस्ताव 30 ऑगस्ट पर्यंत शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था, C/o अमोल गोविंदा महाजन, उत्राण ता.एरंडोल जि.जळगाव पिन 425109 या पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रस्ताव सोबत शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया एरंडोल शाखा येथे देय असलेला 500 (पाचशे रुपये) नामांकन फी असलेला डिमांड ड्राफ्ट (DD) जोडणे आवश्यक आहे…. पुरस्कार साठी निवड झालेल्या मान्यवरांना निवड पत्र द्वारे कळविण्यात येईल. ज्यांची पुरस्कारासाठी निवड होणार नाही त्यांना त्यांनी दिलेले नामांकन शुल्क परत केले जाईल असे संस्थेकडून कळविले आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






