कानपूर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. मात्र, कधीकधी ऐनवेळी अशा काही घटना घडतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. एका तरुणासोबत असंच घडलं.भाजी विक्रेता असलेल्या देवेश याच्या पत्नीचं नऊ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. देवेशला दुसरं लग्न करायचं होतं. दरम्यान, एका नातेवाईकाच्या माध्यमातून त्याची भेट हमीरपूर येथील रहिवासी रजनीश उर्फ पंडित आणि कानपूर रेउना येथील रहिवासी दीपक उर्फ रुद्रेश यांच्याशी झाली. दोघांनी वधूची व्यवस्था करून 70 हजार रुपयांत लग्न लावून देण्याचं सांगितलं.
देवेशने ही अट मान्य केली. रजनीश आणि दीपक दीपकला भेटण्यासाठी गेले.देवेश आणि त्याच्या वडिलांसोबत कानपूर सेंट्रल स्टेशनला पोहोचले. दोघांना बलिया येथील मुस्कान नावाच्या महिलेसोबत भेट करून दिली. महिलेसोबत आणखी एक व्यक्ती होती. त्याचं नाव राजकुमार असून तो तिचा भाऊ असल्याचं सांगितलं गेलं. लग्न निश्चित झालं आणि 70 हजार रुपयांत व्यवहार झाला. यानंतर सर्वजण रसूलाबाद येथील धर्मगढ बाबाच्या मंदिरात पोहोचले, जिथे देवेश आणि मुस्कानने सात फेरे घातले.मंदिरात लग्न झाल्यानंतर मुस्कान देवेशसोबत तिच्या सासरच्या घरी आली आणि तिच्या भावाला सोबत घेऊन आली. .
रात्री मुस्कानने मोठ्या प्रेमाने जेवण बनवलं आणि सासरच्या मंडळींना दिलं. जेवण खाऊन सर्वजण बेशुद्ध झाले. त्यानंतर नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास देवेश शुद्धीवर आल्यावर त्याला नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ बेपत्ता असल्याचे दिसले. खोलीतील सामान विखुरलेलं होतं, ते पाहून त्याला ही बाब समजली. प्रकरण कानपूरमधील आहे.देवेश पटकन विषधनहून कानपूरला जाणाऱ्या चौकात पोहोचला जिथे नववधू मुस्कान तिच्या भावासोबत गाडीची वाट पाहत होती.
देवेशने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीसही तत्काळ सक्रिय झाले आणि दलाल रजनीश उर्फ पंडित आणि दीपक यांना अटक केली.पोलिसांनी पकडलेल्या वधू मुस्कानने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मुस्कानने दोनदा लग्न केलं असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ती ऑर्केस्ट्रामध्ये नाचायची. वर्षभरापूर्वी तिची राजकुमारसोबत भेट झाली. दोघांचं लग्न झालं. त्यानंतर दोघेही टोळीत सामील झाले. राजकुमार तिचा भाऊ म्हणून जात असे. मुस्कान सात वेळा वधू बनली आहे. या टोळीमध्ये एकूण 16 महिलांचा समावेश आहे, जे औरैया ते झाशीपर्यंत गुन्हे करायचे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






