धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात १ महिला जागीच ठार तर ७ महिला आणि चालक जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झायलो कारमधून काही मजूर महिलांना शेतात नेण्यात येत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे एका ठिकाणी कार अचानक पलटी झाली. या अपघातात कारमधील बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत.
दरम्यान, धरणगाव वैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे. तर निनाबाई महाजन, सुमन महाजन, माधुरी महाजन, जिजाबाई महाजन, स्वाती महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी आहेत. सर्व जखमींना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ