यावल :- तालुक्यातील दहिगाव गावात एका इसमाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला ती कपडे धुऊन सुखायला टाकत असतांना मागून पकडून उचलून नेले. व मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. हि घटना ३० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली तेव्हा घडलेला प्रकार बालीकेने आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर ३१ जुलै बुधवार इसमा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिगाव ता. यावल या गावात एक १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या घराच्या मागे कपडे धुऊन सुखायला टाकत होती. तेव्हा तेथे सुरेश साहेबराव माळी हा गेला आणि त्याने या अल्पवयीन मुलीचा हात पकडून उचलून ओढून नेले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार या बालिकेने रात्री आपल्या कुटुंबाला सांगितला व बालिकेच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाणे गाठले.
यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक शोषण पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.