Viral Video: आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत.सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लूएंसर यशाच्या थिखरावर पोहोचले आहेत. परंतु, काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात. अनेकदा सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो.
कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर, तर कधी उंच डोंगरावर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी स्वत:च्याच जीवाशी खेळून अशा ठिकाणी लोकं व्हिडीओ करत असतात. अशा व्हिडीओंमुळे अनेकांच्या जीवावर बेतलेलं आपण ऐकलंच आहे. आता असाच जीवघेणा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला एका उंच ठिकाणी डान्स करायला गेली आणि घसरून पडली.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसते आहे. साडी नेसून ही महिला टेकडीच्या अगदी टोकावर जोरजोरात डान्स स्टेप्स करते आहे. डान्स करताना अचानक टेकडीवरचा एक भाग कोसळतो आणि ती घरंगळत खाली पडते.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसते आहे. साडी नेसून ही महिला टेकडीच्या अगदी टोकावर जोरजोरात डान्स स्टेप्स करते आहे. डान्स करताना अचानक टेकडीवरचा एक भाग कोसळतो आणि ती घरंगळत खाली पडते.
खाली पडल्यानंतर या महिलेच्या संपूर्ण अंगाला माती लागते. पण, पडल्यावर रडायचं सोडून ही महिला चक्क हसायलाच लागते. यावरून कळतंय की तिला जास्त लागलं नसावं. जास्त ठिकाणी खडकाळ भाग नसून मातीचा भाग असल्याने महिला जीवघेण्या प्रसंगातून वाचली. ‘sk.video_creator_9k’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, ‘हड्डी टूटे तो टूटे पर डांस ना छुटे’, तर दुसऱ्याने ‘खाली पडली तरी हसतेय”एक नारी सब पे भारी’, ‘यापुढे कधी रील्स नाही बनवणार’, ‘पहाडतोड डान्स केला आहे’, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.दरम्यान, अशाप्रकारे रील्स करताना अनेक जण आपल्या जीवाला मुकले आहेत. रील्सच्या नादात असे प्रसंग घडलेल्या बातम्या दररोज येत असूनही आजही लोकं स्टंट करत आपल्या जीवाशी खेळतात.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






