वणी : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने तीन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. याप्रकरणी बुधवारी पीडितेच्या तक्रारीवरून तीन आरोपींना अटक केली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
शंकर उर्फ राकेश नामदेव भोस्कर (वय 24), राहुल राकेश यादव (25), शंकर यादव (28) तिघेही (रा. राजूर (कॉ.) अशी आरोपींची नावे आहेत. शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथील तीन तरुणांनी हातठेल्यावर काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री ऑटोतून अपहरण करून तिला वणी घुग्गूस मार्गावर निर्जनस्थळी नेले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
त्यानंतर परत तिला टिळक चौकात सोडून दिले. तरुणांनी केलेल्या या कृत्यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. पीडितेने स्वतःला सावरत पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे. अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासांतच आरोपींना गजाआड केले.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






