पारोळा :- शिवसेना सचिव तथा संपर्क नेते उत्तर महाराष्ट्र मा.भाऊसाहेब चौधरी यांचा उत्तर महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी संवाद दौरा पारोळा येथे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यासमयी आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर बुथ नियोजन, राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी शेतकरी, महिला, गोर-गरिब सर्वसामान्य नागरिक, युवक-युवतींसाठी राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा शहर पातळीवर, गावपातळीवर कशी योग्य ती अंमलबजावणी करता येईल यासाठी कार्य करा, संघटन वाढीसाठी कसे कार्य करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, निलेश पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष जिजाबरावबापु पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष विजुआबा पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी यांचेसह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-युवासेनेचे तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विविध गावांचे आजी-माजी सरपंंच, उपसरपंच, सदस्य, विविध गावांचा विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






