गोंडा (उत्तर प्रदेश) :- पुतण्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. याबद्दल काकीला समजल्यानंतर ती भरपूर रडली. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, असं तिने पुतण्याला सांगितलं. 32 वर्षीय विधवा महिला दोन मुलांसह सासरी रहायची. प्रेमाला वयाच बंधन नसतं असं म्हणतात. प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकतं. असच एक प्रकरण समोर आलय. विधवा काकी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या पुतण्याच्या प्रेमात पडली. पदरात दोन मुलं असतानाही काकीने पुतण्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या.
दोघांमध्ये अफेयर सुरु असल्याच जसं पुतण्याच्या कुटुंबीयांना समजलं, त्यावरुन मोठा गदारोळ झाला. पुतण्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. याबद्दल काकीला समजल्यानंतर ती भरपूर रडली. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, असं तिने पुतण्याला सांगितलं. उत्तर प्रदेशच्या गोंडामधील हे प्रकरण आहे.पुतण्याचा सुद्धा काकीवर जीव जडलेला. त्याने सुद्धा घरच्यांना काकीवर भरपूर प्रेम असल्याच सांगितलं. माझं काकीवर प्रेम आहे.
मी तिच्याशी लग्न करणार हे घरच्यांना निक्षून सांगितलं. कुटुंबीय ऐकले नाहीत, तेव्हा काकी आणि पुतण्याने टोकाच पाऊल उचललं. दोघांनी वेगात येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवलं. हैराण करणारी बाब म्हणजे पदरात दोन मुलं आहेत, याचा सुद्धा त्या महिलेला विसर पडला. आपल्यानंतर त्या मुलांच काय होणार? हा विचारही केला नाही.
‘मुलांची सुद्धा परवा केली नाही’
हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक भागातील आहे. 32 वर्षीय विधवा महिला दोन मुलांसह सासरी रहायची. पुतण्या रवींद्र कुमार सुद्धा सोबत रहायचा. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. महिलेला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. भाच्याच्या प्रेमात महिला इतकी आंधळी झालेली की, कुटुंब, समाजासह तिने आपल्या मुलांची सुद्धा परवा केली नाही.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !