भुलापल्ली (तेलंगणा) :- भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून आणि परिसरातून दररोज बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र, तेलंगणातून बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे.राज्यातील जयशंकर भुलापल्ली जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकावर महिला हेड कॉन्स्टेबलकडे रिव्हॉल्व्हर दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तेलंगणा पोलिसांनी बुधवारी माहिती दिली की, जिल्ह्यातील कलेश्वरम पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने त्याच पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महिला हेड कॉन्स्टेबलने आरोप केला आहे की, उपनिरीक्षकाने सिंचन प्रकल्पाच्या अतिथी कक्षात तिचा लैंगिक छळ केला.
रिव्हॉल्वर दाखवून बलात्कार केला
महिला हेड कॉन्स्टेबलने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपी सब इन्स्पेक्टरने रिव्हॉल्वर दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यासोबतच हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही उपनिरीक्षकाने लेडी हेड कॉन्स्टेबलला दिली होती. आरोपीने आपला अनेकवेळा पाठलाग केल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांचे म्हणणेही समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने दिलेल्या तक्रारीत उपनिरीक्षकाने महिलेला रिव्हॉल्वर दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. आम्ही वस्तुस्थिती जाणून घेऊ.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ