Viral Video: भारताच्या सर्वच राज्यांमध्ये आता मान्सूनचे आगमन झाले आहे. उन्हाने रखरखलेले रस्ते पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे माणसांच्या वागण्यात आलेला रुक्षपणा पहिल्या मातीच्या सुगंधामुळे निघून गेला आहे.जशी झाडाला नवी पालवी फुटावी तसा आनंद ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. कधी रस्त्यात कुत्र्यांबरोबर नाचून लहान मुलांचा डान्स व्हायरल होतोय तर कधी उंदीरमामा स्वतः पावसात नाचताना दिसत आहेत. अशातच एका जोडप्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
एरवी रस्त्यात लोकांचा रोमान्स पहिला की अक्षरशः संस्कार काढणारे लोक सुद्धा या जोडप्याचा गोड क्षण पाहून आपल्याबाबतही असं काही घडावं अशी प्रार्थना करतायत. तर काहींनी मात्र आपल्याबाबत असं का घडू शकत नाही याची धम्माल कारणे दिली आहेत.तुम्ही बघू शकता, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक जोडपं रस्त्याच्या कडेला बाईक लावून पावसात नाचताना दिसत आहेत. एकमेकांकडे पाहताना, हसत, लाजत, हातात हात घेऊन हळुवार पद्धतीने केलेला डान्स पहिल्यांदाच नेटकऱ्यांना खूप रोमँटिक वाटला आहे.
एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटातील सीन वाटावा अशा पद्धतीने ते दोघे कोणत्याही म्युझिकशिवाय आनंद अनुभवतायत. साधारण व्हिडीओचे बॅकग्राऊंड पाहता ही वेळ रात्रीची असावी कारण एकतर अंधार दिसतोय पण रस्त्यात गर्दी सुद्धा तशी फारशी नाहीये. नेमका हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे कळलं नसल्याने नेटकऱ्यांनी आपल्या शहरातील व्यथा सांगायला सुरुवात केली आहे.ही क्लिप मयूर नावाच्या एका व्यक्तीने X वर पोस्ट केली होती, ज्याने नेटिझन्सना विचारले की असा रोमँटिक डान्स तुमच्या पार्टनरबरोबर यंदाच्या पावसात करण्यापासून तुम्हाला कोण थांबवतंय?
यावर नेटकऱ्यांनी भन्नाट मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला की, ‘आम्ही तर नाचू रे पण आमच्याकडे पार्टनर नाही त्याचं काय’, तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘इथे रस्त्यात गाड्यांना जागा नाही, नाचायला कुठे जाऊ’. आमच्याकडच्या रस्त्यात भाऊ खूप खड्डे आहेत, नाचताना पडलो म्हणजे..’ या कमेंटवर नेटकऱ्यांनी सर्वाधिक सहमती दर्शवली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






