वाशिम :- चिंचखेडा-कासोला या गावातील लहान पुल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कासोला येथील एका 23 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी घडली. पुलावरुन जात असताना पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कासोला गावात राहणारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण ही तिच्या वडिलांसोबत वाशिम तालुक्यातील देवगावमध्ये मामाकडे गेली होती. सायंकाळी घरी परतत असताना, वडील व मुलगी दोघेही दुचाकीवरून घराकडे जात होते. तेव्हा चिंचखेडा ते कासोला या दरम्यानचा भूस्तर पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न लागल्याने दुचाकी पुरात पडली.या घटनेत दुचाकीसह दोघेही वाहून गेले. मात्र, वडिलांनी झाडाला धरून आपला जीव वाचवला.
दोन किलोमीटरच्या पुढे पाण्याचा प्रवाह संपला. परंतु अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने वडील सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीचा नदीकाठी शोध घेतला. मात्र कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी चिंचखेडा गाठून गावकऱ्यांना माहिती दिली. यानंतर ती नांदगाव येथे तीन तास शोध घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत किनाऱ्यावर सापडली. तिला वाशिम रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.