धरमपूर :-(पंजाब) मधील गावत एक भयंकर घटना घडली आहे. एका मुलानं आपल्या आईला परपुरूषासोबत बघितल्यानंतर संतापून त्या व्यक्तीचं गुप्तांग छाटलं आहे. याप्रकरणी त्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पोलिसांकडून पुढील तापास केला जात आहे.सदर घटना सोमवारी रात्री घडल्याचं बोललं जात आहे.
विक्रमसिंग असं या आरोपी मुलाचं नाव आहे. विक्रमसिंगला सोमवारी रात्री उशिरा घरी त्याची आई एका परपुरूषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. आपल्या आईला अशा अवस्थेत पाहून त्याला राग अनावर झाला. त्यामुळे विक्रमसिंगनं रागाच्या भरात त्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्याचं गुप्तांग कापून टाकलं. त्यामुळे तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा एक व्यक्ती बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडून होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची परिस्थिती सध्या गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.