लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर काही महिन्यातच वहिनीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते.पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे लहान भावाशी लग्न लावून दिल्याची घटना जौनपूरमध्ये घडली आहे.
बहादूर गौतम याचे मे 2023 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. कुटुंबात याबाबतची माहिती समजली.पत्नी गरोदर राहिल्यानंतर बहादूर गौतमने तिला आपल्याजवळ ठेवण्यास नकार दिला. दुसरीकडे दीर आणि वहिनी यांच्यातील प्रेम वाढत होते.
शेवटी, संपूर्ण कुटुंबाने दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दीर आणि वहिनीनीही यासाठी होकार दिला. यानंतर दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली. कल्याणपूर-जैतपूर येथील जोगीबीर मंदिरात दीर आणि वहिनीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाच्या वेळी पती आणि त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.दरम्यान, अनोख्या लग्नाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे. नागरिक या महिलेच्या पतीचं कौतुक करत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.