Viral Video : सध्याच्या पोरांची लग्न ठरेना झाली आहेत. लग्न होत नसलेल्या मुलाला अनेक मुलीनंतर एखादी मुलगी पसंत करते. तेव्हा त्याचा आनंद गगनाच्याही वर जातो असंच म्हणावं लागतं. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा नवरदेवाचा आनंदी अवतार दाखवणार आहोत.जो, पाहून तुम्हीही हसून-हसून घरात लोळण घ्याल.सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नवरदेवासमोर लोक हलगीच्या तालावर नाचत आहेत. त्यामुळे उत्साही नवरदेवही स्वत:ला रोखू शकला नाही. त्यानेही रस्त्यात नाचायला सुरूवात केली.
रस्त्याच उभे राहून नाचत होता, तोवर ठिक होतं पण नंतर तो रस्त्यावर बसून आणि लोळण घेऊन नाचू लागला.विशेष म्हणजे नवरदेवाच्या मागे छत्री घेऊन उभारलेला व्यक्तीही नाचत होता. आणि नवरदेवाच्या डोक्यावर छत्री हटू नये यासाठी धडपडत होता. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर sambalpuriya_ame_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.या नवरदेवाला त्याचे लग्न ठरल्याचा इतका आनद झाला आहे की, त्याने रस्त्यात पावसाने झालेल्या चिखलात झोपून डान्स केला आहे.
ज्यामुळे त्याची लग्नाची शेरवानीही खराब झाली आहे. तरीही नवरदेवाचा उत्साह काही कमी झाला नाहीय.हा मजेदार व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे 5 लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, मी कदाचित माझ्या स्वतःच्या लग्नात तितका आनंदी नसेन जितका मला त्यांचे लग्न पाहून वाटत आहे. आणखी एका युजरने लिहिले, भाऊ शेरवानी गेली, आता नवरीही पळून जावू नये म्हणजे मिळवलं.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.