पूर्णा :- चुडावा (ता. पूर्णा) येथे एका २८ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी दोन वर्षांच्या चिमुकलीसह छताला गळफास घेऊन जीवन संपविले. ही मन हेलावणारी घटना गुरूवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. द्रौपदी इंद्रजित देसाई (वय २८) आणि आळंदी इंद्रजित देसाई ( वय २) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेचे कारण समोर आलेले नाही.
घटनेचे अद्याप कारण कळू शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, चुडावा येथे द्रौपदी हिने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत स्वत:च्या चिमुकलीसह छताच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेचे अद्याप कारण कळू शकलेले नाही. मृत महिलेचा भाऊ बाबाराव विठ्ठलराव लोखंडे ( मूळ रा. सातेफळ वाघ, सध्या रा. चुडावा) यांनी फिर्याद दिली आहे. चुडावा पोलीस ठाण्याचे सपोनि नरसिंग पोमनाळकर, पोउनि बळीराम राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मित मृत्युची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोउनि बळीराम राठोड करीत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






