लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर रेल्वे स्टेशनवर जीआरपीची टीप गस्तीवर होती. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पथकाला 5 मुलं उभी दिसली. मुलं जीआरपी टीमला पाहून घाबरली. या मुलांकडे पाहून जीआरपीला संशय आला.जीआरपीनं त्यांना काही प्रश्न विचारले. ज्याची उत्तरं काही नीट या मुलांना देण्यात आली नाही. अखेर पोलिसांनी या मुलांची झडती घेतली आणि जे सापडलं त्यामुळे सर्वांना धक्का बसला.या 5 मुलांकडून 47 अँड्रॉईड फोन जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 11 लाख रुपये आहे. जीआरपीने मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
किंगपिनसह पाच मोबाईल चोरांना अटक करण्यात आली आहे.टोळीतील चार सदस्य झारखंडमधील असून एक सदस्य गोरखपूरचा आहे. गोरखपूरच्या स्थानिक ऑटो चालकाच्या मदतीने मोबाईल चोरांची एक बदमाश टोळी शहरात फिरत असे आणि मोबाईल चोरीच्या घटना घडवून आणत असे. सर्व आरोपी रेल्वे स्थानकावरून टेम्पो भाड्याने घेत असत. ही टोळी चोरीचे स्मार्टफोन बंगाल आणि झारखंडमध्ये नेऊन विकायची, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
8 दिवसांत चोरीला गेलेले मोबाईल जप्त
एसपी रेल्वे डॉक्टर अवधेश सिंह यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, 5 महिन्यांपूर्वी याच टोळीतील लोक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेले होते, मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर ते पुन्हा मोबाईल चोरीला लागले होते. त्यांच्याकडून गेल्या आठ दिवसांत चोरीला गेलेले मोबाईल सापडले आहेत.
रेल्वेचे एसपी डॉ. अवधेश सिंह म्हणाले, या चोरट्या टोळीचे सराईत गुन्हेगार लहान मुलांच्या मदतीने मोबाईल चोरीच्या घटना घडवत असत. मोबाईल चोर टोळी चोरीच्या मोबदल्यात दर महिन्या्ला मुलाला 25 हजार रुपये मजुरी म्हणून देत असे. रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच शहरातील गजबजलेल्या भागात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय होत्या.
बस स्थानकात महिलांचे रोकड अन् मोबाईल लांबवले; चोराला पाहून सर्वांनाच धक्का
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीचा फायदा उचलत भुरट्या चोरट्यांनी तीन महिलांच्या पर्सवर हात साफ केला. यात रोख रक्कम आणि मोबाईल अशा मौल्यवान वस्तू लांबवण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे सर्व करणारी एक अल्पवयीन मुलगी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या मुलीमागे तिचे साथीदारही होते. ही सर्व घटना बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गर्दीचा फायदा घेत चोरी
11 जानेवारी सायंकाळी 5:55 वाजताची ही घटना. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात खेड ते बिजघर अशी जाणारी एसटी बस प्लॅटफॉर्म वर लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. याच गर्दीचा फायदा घेत तीन प्रवाशांच्या चोऱ्या झाल्या. तीनही महिला प्रवासी होत्या. त्यांच्या पर्स मधील 7 हजार 500 रुपयांची रोकड आणि मोबाईल अशा वस्तूंची चोरी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. अखेरीस खेड बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक लहान मुलगी संशयास्पदरित्या गर्दीत इकडून तिकडे फिरताना आढळली.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






