VIDEO नवी दिल्ली- एका अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आरोपी व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.’फ्री प्रेस जर्नल’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सदर बाझारमधील हा धक्कादायक प्रकार आहे. एक व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन लाजिरवाणे कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमधील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे.
व्यक्तीची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. शिवाय पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं समजतंय.व्यक्ती गर्दीमध्ये एका तरुणीच्या मागे जाऊन उभारतो आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करतो. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. पीडित मुलगी या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिन्न असल्याचं देखील दिसत आहे. बाजारमध्ये असलेल्या काही लोकांना ही गोष्ट लक्षात येते असंही व्हिडिओ पाहून वाटतं, पण पुढे काय होतं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट नाही.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे.
पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे. पण, अद्याप आरोपीची ओळख होऊ शकलेली नाही, तसेच तो सापडलेला देखील नाही. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. आरोपीला पकडा आणि याला कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी लोक करु लागले आहेत.एका युझरने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, ‘गर्दीचा फायदा घेऊन एक व्यक्ती अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत आहे. दिल्लीच्या लोकांनो तुम्हाला हा व्यक्ती दिसला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.’ दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं की, ‘असे बलात्कारी लोक सहज कधीच सापडत नाही. व्हिडिओ व्हायरल करा, म्हणजे या नराधमाला पकडता येईल.
हे पण वाचा
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.
- प्रसूतीसाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेच्या तडफडून मृत्यू; पोटातील बाळही दगावले.
- खळबळजनक! शिक्षक दाम्पत्याने मुलीसह रेल्वे रुळावर झोपून संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव झाले सुन्न.
- नातेवाईकांकडे लग्नासाठी जात असलेल्या होंडा सिटी कारला भरधाव वेगाने येत असलेल्या ऑडी कारने धडक दिल्याने सुरत येथील दाम्पत्य ठार
- घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ जळगाव शहर व तालुका सभा संपन्न