कल्याण :- तिघांनाही चांगली नोकरी. घरची स्थितीही तशी चांगली. पण त्यांना पैशाची हाव होती. हे निमित्त झाले. त्यांना एक अल्पवयीन तरूण भेटला. त्याने त्यांना चोरीची आयडिया दिली.चोरी केली तर काही होणार नाही असं ही सांगितलं. मग काय ते तिघेही चोरीकडे वळले. एका दिवसात पाच चोऱ्या केल्या. पण एक चुक त्यांना भारी पडली आणि तिघेही शेवटी गजाआड गेले. ही घटना घडलीय कल्याणमध्ये.कल्याण पूर्वेतील हाजी मलंग रोड परिसरात दीपाली पाटील ही तरूणी चालली होती.
त्यावेळी तिच्या मागून एक भरधाव स्कुटी आली. त्यावर असलेल्या तरूणांनी तिच्या हातातला मोबाईल लांबवला. दीपालीने तातडीने कोळसेवाडी पोलिस स्थानक गाठले. पोलिसांनीही तातडीने तपास हाती घेतला. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दीनकर पगारे, हेमंत ढोले यांच्या टिमने तपास सुरू केला.ही घटना ज्या ठिकाणी झाली तीथले सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यांनी ही घटना एक कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसले.
त्यात स्कुटीचा नंबर पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तपासाची सुत्रे जोरात हलली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला.त्यातून अक्षय इंगोले,उमेश तरे आणि सुमित पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जेव्हा यांची चौकशी केली त्यावेळी पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती मिळाली.हे तिघेही चांगल्या घरातले आहेत. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. अक्षय इंगोले हा गोंधळी आहे. तो जागरणाचे काम करतो. उमेश हा अंबरनााथमधील एका मोठ्या कंपनीत कंटेनर लोडिंगचे काम करतो. तर सुमित पाटील हा आयटीआय टर्नर आहे. या तिघांची कामाईही चांगली आहे.
पण मौजमजेसाठी त्यांना पैसे हवे होते. त्याच वेळी त्यांना अल्पवयीन तरूण भेटला. त्याने चोरी करण्याची आयडिया या तिघांना दिली. शिवाय काही होत नाही. पैसेही मिळतात. पकडलो जात नाही असेही सांगितले. त्यामुळे त्यांनी एका दिवसात पाच चोऱ्या केल्या. पाचही मोबाईल त्यांनी चोरले. पण शेवटी गजाआड झाले. विशेष म्हणजे यांचा म्होरक्या हा अल्पवयीन आहे. तो मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४