गांधीनगर:- गुजरात येथील द्वारकेत २४ वर्षीय तरूण याग्निक नावाच्या हिंदू युवकाचे एका युवतीसोबत दीड वर्षाआधी प्रेम संबंध होते. त्याने प्रेयसीसोबत विवाह केल्याने युवतीच्या भावाने याग्निकला कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवले.याप्रकरणात सात जणांचा समावेश आहे. हे प्रकरण ३ ऑगस्ट रोजी शेडखाई येते घडले होते.मिळालेल्या माहितीनुसार, याग्निकचे रजमा नावाच्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी विवाह करून आपले गाव गाठले होते. याग्निकच्या पत्नीने आपल्या चिमुकलीला जन्म दिला होता. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू होते.
दोघांचा सुखाचा संसार सुरू होता. रजमाच्या घरातील नातेवाईक रजमा आणि याग्निकचे नाते स्विकारतील असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी आपल्या आई-बाबांसोबत पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मागील शनिवारी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी याग्निक हा आपल्या मित्रासोबत गावातील एका बस स्थानकावर गेला होता. त्यावेळी जे काही घडले त्यामुळे याग्निकच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. याग्निक आपल्या मित्रासोबत बस स्थानकाजवळ गेला होता,
तेव्हा साजिद, अल्पवयीन आरोपी आणि त्याचे काका सलीम हुसैन, आमेद, जुमा, उस्मान आणि कासिम या सातजणांनी मिळून याग्निकवर कुऱ्हाड, लोखंडी पाईप, चाकूने जोरदार हल्ला केला. यावेळी याग्निकसोबत असलेल्या मित्राने हात जोडून न मारण्याची विनंती केली होती. मात्र रजमाच्या नातेवाईकांनी दया दाखवली नाही.रजमासोबत विवाह केल्याने कुऱ्हाड, चाकू, लोखंडी पाईपने जीवे मारण्याचा कट रजमाच्या नातेवाईकांनी केला होता. आमच्या मुलीसोबत त्याने विवाह केल्याने रजमाच्या नातेवाईकांनी याग्निकला बेदम मारहाण केली.
ही बातमी याग्निकच्या आईला आणि पत्नी रजमाला समजताच त्यानी घटनास्थळी पोहोचत रूग्णवाहिका घेऊन याग्निकला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र, त्याठिकाणाहून पुन्हा याग्निकला जामनगर येथील रूग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितले गेले. मात्र रूग्णावाहिकेतून जामनगर येथे पोहचेपर्यत याग्निकचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, मृत्यू झालेल्या याग्निकच्या आईने भारवाड़ येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी साजिद, अल्पवयीन आरोपी आणि त्याचे काका सलीम हुसैन, आमेद, जुमा, उस्मान आणि कासिम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांच्यावर १०३ (२), १८९ (२), १८९ (४), १९१९ (२), १९१ (३), १९० कलमान्वये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर रजमाने आपल्या पतीच्या हत्येच्या बदल्यात न्याय मागितला आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.