जयपूर : रस्त्यावर झाडू मारणारी आशा कंडरा 2021 मध्ये उपजिल्हाधिकारी बनून बरीच चर्चेत आली. राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (RAS) 2018 च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचं खूप कौतुक झालं.पण यावेळी ती ज्या कारणामुळे चर्चेत आली, ते अतिशय वेगळं आहे. सध्या जयपूरमध्ये तैनात असलेल्या आशा कंडरा यांना 12 जूनच्या रात्री राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 1 लाख 75 हजार रुपयांची लाच घेताना पकडलं. ती सफाई कामगारांच्या भरतीसाठी लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती.
रिपोर्टनुसार, आशा कंडरा 1997 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्या होत्या. यानंतर त्यांनी आपलं शिक्षण सोडलं. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून 2013 मध्ये पुन्हा अभ्यास सुरू केला आणि बीए केलं. यानंतर, 2018 मध्ये RAS 2018 फॉर्म भरला.आशा RAS 2018 च्या प्रिलिम्स, मेन आणि मुलाखतीसाठी गेल्या. मात्र निकालासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली. यावेळी कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी जोधपूर महापालिकेत स्वच्छता कर्मचारी पदासाठी अर्ज केला. या पदावर निवड झाली. सतत दोन वर्षे ती काम करत राहिली. RAS चा निकाल फेब्रुवारी 2021 मध्ये आला.
ज्यामध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली. आशा कंडारा यांनी राजस्थान प्रशासकीय सेवेत 728 वा क्रमांक पटकावला होता.बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आशा कंडारा यांनी सांगितलं होतं की, तिचे वडील राजेंद्र कंडारा फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अकाउंट ऑफिसर होते आणि तिची आई घराची काळजी घेत असे. मात्र संयुक्त कुटुंब आणि सामाजिक दबावामुळे बारावीनंतरच तिचं लग्न झालं. मात्र वयाच्या 32 व्या वर्षी घटस्फोटही झाला. त्यावेळी ती दोन मुलांची आई होती.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






