झाशी :- मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपली व्यथा सांगितली आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याने प्रेमविवाह केला होता आणि पत्नीला शिकविण्यासाठी खूप कष्ट केले, मात्र जेव्हा ती अकाउंटंट झाली तेव्हा तिने त्याला सोडलं. पत्नीसाठी तो आता पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. पण, न्याय मिळाला नाही. नीरज विश्वकर्मा असं व्यक्तीचं नाव असून तो कारपेंटर म्हणून काम करतो. ५ वर्षांपूर्वी झाशीच्या सत्यम कॉलनीत राहणाऱ्या रिचा सोनी हिला तो एका मित्राच्या घरी भेटला.
त्यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि आनंदाने राहू लागले. यावेळी रिचाने तिला पुढे शिक्षण घ्यायचं असल्याचं सांगितलं. रिचाला शिकवण्यासाठी तो मजुरीचे काम करायचा. रिचाची अकाउंटंट म्हणून निवड झाल्यावर ती बदलली. यानंतर तिने पतीला सोडलं. त्यानंतर ती आजपर्यंत घरी आलेली नाही. पत्नीला मिळवण्यासाठी तरुणाने अधिकाऱ्यांपासून पोलिसांपर्यंत चकरा मारल्या, मात्र पत्नी सापडली नाही. पत्नीला जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीपत्र मिळाल्याचं समजताच तो तिला भेटण्यासाठी तेथे गेला, मात्र तेथूनही त्याला रिकाम्या हाताने परतावे लागले.
अपॉइंटमेंट लेटर घेऊन ती गेली पण त्याला भेटली नाही.नीरज म्हणाला, “मी १८ जानेवारीपासून त्रस्त आहे. माझी पत्नी रिचा सोनी, जी आता अकाउंटंट झाली आहे ती मला सोडून गेली आहे. मी माझ्या पत्नीसाठी सर्वत्र फिरलो आहे. जेव्हा मला हे कळले तेव्हा तिला शोधण्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. रिचाला शिकविण्यासाठी मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मी कारपेंटर आहे.
वाटेल ते काम केलं. रोज ४००-५०० रुपये मिळायचे. तिच्या शिक्षणासाठी कर्ज देखील घेतलं.””मला तिची खूप आठवण येते. रात्री झोपही येत नाही. आज ती म्हणते की, आमचं लग्नच झालेले नाही. माझ्याकडे लग्नाचे फोटो आणि सर्टिफिकेट आहे, ते खोटे आहेत का? फेब्रुवारी २०२२ मध्ये ओरछा येथे आमचं लग्न झालं.” दुसरीकडे, पत्नीचे म्हणणे आहे की तिने नीरजशी अजिबात लग्न केलेलं नाही. आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याचं तिने म्हटलं आहे.
हे पण वाचा
- Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने धू धू धूतले पहा व्हिडिओ.
- 9 वर्षांच्या मुलगा अभ्यास करत नाही म्हणून बापानेच पोटच्या मुलाचा घेतला जीव; केला बनाव पण पोलिसांनी अंत्यविधी थांबविली अन् घृणास्पद कृत्य आल् समोर
- बायकोन माहेरी जाण्याच्या केला हट्ट,दोघांमध्ये झाला वाद माजी सैनिक पतीने केली पत्नीची हत्या अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, इतकंच नाहीतर….
- दोघं अनेक वर्षं प्रेमबंधनात, कुटुंबीयांचा विरोध 5 वर्षांपूर्वी घरातून पळून जाऊन केलं लग्न,अन् आता दोघांनी जीवन संपवल्यान सगळ्यांनाच बसला धक्का.
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.