छपरा (बिहार):- प्रेम प्रकरणातून धोका मिळण्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेचे अनेकदा गुन्ह्यातही रूपांतर झाले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका लेडी डॉक्टरने एका नगरसेवकाचे प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नेमकं या लेडी डॉक्टरने असं का केले?आणि ही संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. बिहारच्या छपरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत लेडी डॉक्टर असलेल्या महिलेचे नाव अभिलाषा कुमारी आहे. या महिलेच्या घरी नगरसेवक वेद प्रकाश आला होता. या दरम्यान दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर लेडी डॉक्टर नगरसेवकाला ज्यूस प्यायला देऊन अंघोळी करण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली होती.
अंघोळी करत असताना लेडी डॉक्टरने नगरसेवकाला बाथरूममध्ये बोलावून घेतले आणि चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला होता. डॉक्टर इतक्यावरच थांबली नाही तर तिने त्याचा प्रायव्हेट पार्ट फ्लश देखील करून टाकला होता. या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत नगरसेवक बाथरूममधून बाहेर पडला. अशा अवस्थेत नगरसेवक घराबाहेर देखील पडू शकत नव्हता. म्हणून तो डॉक्टरच्याच घरात बिछान्यावर व्हिव्हळत पडला होता. लेडी डॉक्टरला ज्यावेळेस या गोष्टीचा पछतावा झाला त्यावेळेस तिने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन नगरसेवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तसेच लेडी डॉक्टरने घटनेची कबुली दिल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते.
लेडी डॉक्टरने गुप्तांग का छाटलं?
लेडी डॉक्टर अभिलाषा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिलाशाचे गेल्या दोन वर्षापासून नगरसेवक असलेल्या वेद सोबत अफेयर सुरु होते. या अफेयर दरम्यान लग्नाचे आमीष दाखवून वेदने अनेकदा अभिलाषा सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या दरम्यान ती प्रेग्नेंट देखील राहिली होती. मात्र नगरसेवकाने तिला दोनदा अबॉर्शन करण्यास भाग पाडले होते. तसेच अभिलाषा ज्या ज्या वेळेस लग्नाचा विषय काढायची, त्या त्या वेळेस नगरसेवक विषय टाळायचा.दरम्यान या अफेअरची माहिती अभिलाषाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरूवात केली.
या दबावानंतर अभिलाषाने देखील पुन्हा नगरसेवकावर लग्नासाठी दबाव टाकला. या दबावानंतर नगरसेवक कसा बसा तयार झाला होता. त्यानुसार 30 तारखेला कोर्ट मॅरीज करायचे ठरले होते. अभिलाषाने या लग्नाची जोरदार तयारी सूरू केली होती. मात्र लग्नाच्या दिवशी नगरसेवक कोर्टात पोहोचलाच नाही. त्याचा मोबाईल देखील बंद होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नगरसेवकाने तिला धोका दिला होता. त्यामुळे अभिलाषाला नगरसेवक आपला वापर करत असून धोका देत असल्याचे कळून चुकले होते.
त्यामुळेच या गोष्टीचा बदला घेण्यासाठी अभिलाषाने नगरसेवकाचे गुप्तांग छाटल्याची पोलिसांसमोर कबुली दिली. या प्रकरणात आता पोलिसांनी लेडी डॉक्टर हिला अटक केली आहे. आणि नगरसेवक वेदला पटना मेडीकल कॉ़लेजमध्ये उपचारासाठी पाठवले आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.