Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नातेवाईक अन् कुटुंबातील लोक डान्स मजा करताना दिसतात तर कधी नवरदेव नवरी उखाणे म्हणताना दिसतात. कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी भावूक करणारे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीसाठी खास डान्स करताना दिसतो. नवरदेवाचा डान्स पाहून नवरी भावूक होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे.
व्हिडीओमध्ये नवरी खूर्चीवर बसलेली दिसत आहे तर नवरदेव तिच्यासमोर डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाच्य आजुबाजूला नवरदेवाच्या बहिणी आणि भाऊ उभे आहेत आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर सुंदर डान्स करत आहे. नवरी खूर्चीवर बसून नवरदेवाचा डान्स बघत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. ‘हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी’ या लोकप्रिय गाण्यावर नवरदेव डान्स करताना दिसतो. त्यानंतर तो नवरीजवळ जातो आणि तिला जागेवरून उठवतो आणि तिच्या समोर डान्स करतो. नवरदेवाने दिलेले सरप्राइज आणि त्याचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज पाहून नवरी थक्क होते आणि ती क्षणात भावूक होते. तिला अश्रु अनावर होतात.
त्यानंतर सर्व जण तिच्याजवळ जमतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल तर काही लोकांना त्यांच्या लग्नाची आठवण येईल.tejujadhavs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, ‘खुप छान दादा असेच कायम आनंदात ठेवा वहिनीला’ तर एका युजरने लिहिलेय, ‘ बायको नाही वाटली नखरेवली पण नवरा मात्र नखरेवाला वाटला. खुप छान दादा , सुखी संसार करा’ आणि एका युजरने लिहिलेय, ‘खूपच नशीबवान असतात अश्या मुली ज्यांना असा जीव लावणारा आणि त्यांचे नखरे झेलणारा नवरा मिळतो…. असेच आयुष्यभर आनंदी रहा… असे म्हणतात ३ हट्ट असतात त्यात मी स्त्री हट्ट पण असतो असे ऐकले आहे परंतु इथे तर नवराच हट्ट करत आहे ते पण खूप छान. आयुष्यभर आनंदी रहा एकमेकांना खूप जीव लावा’
हे पण वाचा
- अमळनेर तालुक्यात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादात तरुणाच्या केला खून;तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच केली अटक.
- “गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक : अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात भेट”
- जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ