Viral Video : कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हेब्बल परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला घराच्या छतावर भांडी घासत होती. यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि ती थेट खाली जमिनीवर कोसळली.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सविस्तर माहिती अशी की, रुबाया नावाची महिला घराच्या छतावर भांडी घासत होती.
यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि तोल जावून ती पॅराफीट वॉलवर लटकली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला छतावर लटकलेली दिसत आहे, तर तिचा पती तिला वर खेचण्याचा प्रयत्न करतोय. महिला आपला जीव वाचवण्यासाठी बरीच धडपड करते, पण अखेर तिचा हात सुटतो आणि ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली उभ्या असलेल्या दुचाकींवर पडते.
महिला रुग्णालयात दाखल
सुदैवाने महिला खाली पडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे, पण तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू केला आहे. महिला चुकून पडली की, तिला ढकलण्यात आले, याचा तपास केला जात आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






