लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पतीनं पत्नीची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
कोलार (कर्नाटक):- कोलार इथं हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी लव्ह मॅरेजनंतर काही तासांतच युवकाने त्याच्या पत्नीची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीनं स्वत:वर वार करून आत्महत्या केली आहे. या घटनेत युवकाचाही मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ ऑगस्टला दोघांचे धूमधडाक्यात लग्न झालं, ज्यात दोघांचे मित्र आणि कुटुंबातील लोक सहभागी होते. लग्नानंतर दोघांनी कुटुंबासोबत काही वेळ घालवला. त्यानंतर दोघं एका नातेवाईकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. दोघांमधील भांडण इतकं वाढलं की हाणामारी झाली. या झटापटीत नवीननं लिखितावर धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच शस्त्राने स्वत:वरही हल्ला केला.
याचवेळी नातेवाईक तिथे पोहचले आणि घरचा दरवाजा तोडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. या दोघांनी घाईघाईनं हॉस्पिटलला आणलं मात्र त्याठिकाणी लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तोपर्यंत नवीन जिवंत होता मात्र तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. गुरुवारी सकाळी नवीनचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नवीन आणि लिखिता यांना सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे घरी नेले होते. तिथे दोघांनी चहा घेतला त्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले आणि आतून दरवाजा बंद केला. काही मिनिटांत खोलीतून एकमेकांवर जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे नातेवाईक धावत त्या खोलीकडे गेले तेव्हा खिडकीतून पाहताच नवीन लिखितावर हल्ला करत असताना दिसला. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तुटला नाही. मात्र काही वेळाने दरवाजा तुटला तोपर्यंत लिखिता आणि नवीन दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नवीन हा कपड्याच्या दुकानाचा मालक होता तर लिखिता ही प्री यूनिवर्सिटीत शिक्षण पूर्ण करत होती.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.