जामनेर तालुक्यात रक्षाबंधनाला माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू, कुटुंबीयांच्या आक्रोश.

Spread the love

जामनेर : काही दिवसांवर रक्षाबंधन असल्याने सासरी गेलेल्या बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी माहेरी येत असतात. अशाच प्रकारे रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित बहिणीवर मात्र काळाने घाला घातला आहे.रात्री घरात असताना सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथे घडली आहे.

जामनेर तालुक्यातील गोंदेगाव तांडा येथील पुजा काशिनाथ पवार (वय २१) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. गोंदेगाव येथे पती, २ वर्षांचा मुलगा यांच्यासह वास्तव्यास होत्या. दरम्यान १९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने तीन दिवस अगोदरच पिंपळगाव कमानी येथे आई- वडिलांकडे माहेरी आल्या होत्या. दरम्यान १६ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास सर्वजण घरात असताना पूजा पवार यांना हाताला सर्पदंश झाला. काहीतरी चावल्याचे पूजा यांच्या लक्षात आले.

दरम्यान हातावरील दंशाची निशाणी पाहून सापाने दंश केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने पूजा पवार यांना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासून पूजा यांना मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तीन वर्षांपुर्वीच पूजाचे लग्न झाले होते. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार