नाशिक :- नाशिकहून मुंबईच्या दिशेन येणाऱ्या एका कंटेनरला भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ कंटेनरला अपघात झाला आहे.
पाच मृतांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तीन बाहेर काढलेल्या मृतांमध्ये दोन तरुणांसह एका चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे.
कसारा घाटात अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. यावेळी ९ वर्षांच्या चिमुकल्यासह २१ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा दोन तरुणांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला आहे. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला.
यात कंटेनरमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात विजय घुगे (६०,), आरती जायभावे (३१), सार्थक वाघ (२०), चालक योगेश आढाव (५०) आणि रामदास दराडे (५०) यांचा मृत्यू झाला. अक्षय घुगे ((३०), श्लोक जायभावे (पाच वर्ष), अनिकेत वाघ (२१) या जखमींना रुग्णवाहिकेने कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. दरीत टँकरचे सर्व भाग विखुरले गेले असून त्याची ओळख पटणेही अवघड झाले आहे. अपघातात मृत व जखमी सिन्नर तालुक्यातील नेरळ आणि संगमनेर तालुक्यातील निमोण येथील आहेत. चालक कोपरगावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
मृत्यूमुखी पडलेले प्रवासी
१) विजय घुगे (वय ६०, रा. निमोण, ता. संगमनेर) २) आरती जायभाय (वय ३१, रा.नालासोपारा) ३) सार्थक वाघ (वय २०, रा. निहळ, ता. सिन्नर४) रामदास दराडे (वय ५०,रा. निहळ, ता. सिन्नर)५)चालक योगेश आढाव (रा. राहुरी)या पाच व्यक्तींची दुर्देवी मृत्यू झाल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे.
जखमीची नावे
१)अक्षय विजय घुगे (वय ३०, रा. निमोन, ता. संगमनेर) २)श्लोक जायभाय (वय ५, रा. नालासोपारा) ३) अनिकेत वाघ (वय २१, रा. निहळ, ता. सिन्नर) ४) मंगेश वाघ (वय ५०, रा. निहळ ता. सिन्नर)हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे आणण्यात आले आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन