नांदेड :– अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे या संबंधातून तिला मुलगी झाली.
या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे याच्या घरचे भांडण करत होते. त्यातून शेषराव भुरे याने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यांनतर मुलीचे प्रेत एका पिशवीत टाकून नदीत फेकून दिले. याबाबत माहिती मिळाल्यावर प्रेत बाहेर काढले. आरोपी महिला आणि शेषराव भुरे दोघांना देगलुर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी गर्भपात करताना युवतीचा मृत्यू झाला होता. प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण, आपल्या आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तिच्या दोन चिमुकल्यांना लक्षात आले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या दोन चिमुकल्यांना निर्दयीपणे इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले होते. यामध्ये आईचा गर्भपातामुळे मृत्यू झालाच पण प्रियकराने तिच्या दोन चिमुकल्यांचाही जीव घेतला आहे.
हे पण वाचा
- अमळनेर तालुक्यात कारमधील तरुणांनी दुचाकीला कट मारल्यानंतर झालेल्या वादात तरुणाच्या केला खून;तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासातच केली अटक.
- “गुलाबराव पाटील यांची माणुसकीची झलक : अपघातग्रस्त माजी उपसरपंचांची रुग्णालयात भेट”
- जनतेचा असलेला प्रचंड प्रतिसाद आणि भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ – गुलाबराव पाटील
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ