नोएडा : नोएडातल्या सर्फाबादमधल्या एका नाल्यात 26 जून रोजी एका गोणीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पटली असून, त्याची हत्या त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकराकरवी घडवून आणली होती, असं स्पष्ट झालं आहे.पोलिसांनी ती महिला, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या भावाला अटक केली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून स्कूटीवरून नोएडात आणला आणि नाल्यात फेकून तो फरार झाला होता.डीसीपी रामबदन सिंह यांनी सांगितलं, की सर्फाबादमधल्या एका नाल्यात एका शिवलेल्या गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. खूप प्रयत्न करूनही त्याची ओळख पटत नव्हती.
त्यानंतर एसीपी शैव्या गोयल यांनी एक टीम तयार केली. ती टीम दिल्ली-एनसीआरसह अन्य जिल्ह्यांमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती हरवल्याच्या तक्रारींची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत होती. इंदिरापुरम पोलीस ठाण्यातल्या पोलिसांनी सोमवारी नोएडा पोलिसांशी संपर्क साधून सांगितलं, की सर्फाबादमधल्या नाल्यात फेकण्यात आलेला मृतदेह बिहारमधल्या वैशाली इथल्या पप्पू सिंह याचा आहे.पप्पूची हत्या त्याची पत्नी मनीषाने आपला प्रियकर पंकज सक्सेना याच्याकरवी केली आहे. या हत्येसाठी पंकजचा भाऊ अतुलनेही त्याला मदत केली. नोएडा पोलिसांनी त्या तिघांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू केली.
हत्येचा गुन्हा कबूल केल्यानंतर तिघांना मंगळवारी कोर्टासमोर सादर करण्यात आलं. तिथे कोर्टाने त्या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.पंकज सक्सेनाने ही हत्या करण्यासाठी पेट्रोल पंपाजवळ न्यायखंड 2 जी 625मध्ये एक खोली भाड्याने घेतली. पंकजने पप्पूला मादूर पिण्यासाठी आणि भांडण मिटवण्यासाठी त्या खोलीत बोलावलं. पंकज आणि अतुल या दोघांनी मिळून पप्पूला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पप्पूची पत्नी मनीषा त्या खोलीत आली. तिघांनी मिळून पप्पूला प्लास्टिकच्या रश्शीने गळा आवळून ठार केलं.मनीषाने आपला पती हरवला असल्याची तक्रार इंदिरापुरम पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
पोलिसांनी अनेकदा तिला आपला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं; मात्र ती दर वेळी काही तरी कारणं सांगून टाळत राहिली. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. तिची कडक चौकशी केल्यानंतर मात्र तिचा बांध फुटला आणि तिने प्रियकराकरवी पतीचा खून केल्याचं मान्य केलं. सध्या पप्पू मनीषासह गाझियाबादमधल्या इंदिरापुरममध्ये खोली घेऊन राहत होता.पप्पू आणि मनीषा यांचा विवाह 2008मध्ये झाला होता. त्यांना 13 वर्षांचा मुलगाही आहे. दोन वर्षांपूर्वी मनीषाची भेट पंकज सक्सेनाशी झाली होती. त्यानंतर दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. मनीषाला पुढचं जीवन पंकजसोबत व्यतीत करायचं होतं.
त्या दोघांना पप्पूने एकदा आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि त्याचा पारा चढला. त्याने मनीषाला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी पप्पूला संपवण्याचा कट रचला.त्या कटानुसार पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच खोलीत ठेवून खोलीला कुलूप लावून मनीषा आपल्या खोलीत गेली. रात्री पंकज पप्पूची स्कूटी घेऊन अतुलला सर्फाबादला सोडण्यासाठी आला. त्यानंतर पंकज मनीषाच्या खोलीवर आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास मनीषा आणि पंकज न्यायखंड- 2मधल्या खोलीत गेले. काही वेळानंतर अतुलही तिथे आला. काळोख पडल्यावर आणि गल्ली सुनसान झाल्यावर तिघांनी मिळून मृतदेह गोणीत भरून स्कूटीवर मध्ये ठेवला. अतुल स्कूटी चालवत होता. पंकज मागे बसला होता. त्यांनी मृतदेह सर्फाबादच्या नाल्यात फेकला.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.