धुळे – शिक्षक पती, पत्नीचे थकीत वेतन देण्यासाठी दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाला आहे. परंतु, हे थकीत वेतन त्यांना मिळाले नाही. या संदर्भात त्यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकच्या अतिरिक्त अधीक्षक मीनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तेव्हा तक्रारदार व त्यांची पत्नी यांना ही रक्कम देण्यासाठी गिरी यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली.
या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कार्यालयात दोन लाख रुपये स्वीकारत असताना गिरी यांना पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे यांनी तपासी अधिकारी रूपाली खांडवी यांच्यासह सापळा पथकातील राजन कदम, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ