यावल :- तालुक्यातील निंबादेवी धरण येथे मित्रांसोबत गेलेल्या तरुणाचा सांडव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०, रा.निमगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव असून डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. याबाबत यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, यावल तालुक्यातील निमगाव येथील वेदांत पाटील हा रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत निंबादेवी धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला.दरम्यान, त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.