पंढरपूर :- रक्षाबंधनाचा पवित्र सण संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. लाडक्या भावाला ओवाळणी करण्यासाठी बहिणींनी सुंदर राख्या खरेदी केल्याच्या पाहायला मिळत आहे. या आनंदाच्या सणाची चाहूल सर्वांनाच लागली असताना पंढरपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.रक्षाबंधणाच्या सणासाठी भावासोबत प्रवास करणाऱ्या बहीणीवरही काळाने घाला घातला. दोघेही ज्या कारने प्रवास करत होते, त्या कारला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला. रोहित तात्यासो जाधव (२२), ऋतुजा तात्यासो जाधव (१९) अशी मृतांची नावं आहेत. पंढरपूरपासून जवळच असलेल्या मंगळवेढा मार्गावरील भानवसे येथे हा अपघात घडला.
बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं?
शिक्षणासाठी ऋतुजा पुणे येथे रहात होती. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सोमवारी असल्याने ऋतुजा पंढरपूर येथून एसटी बसने रविवारीच निघाली होती. तिला घेण्यासाठी तिचा भाऊ रोहित कार घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाला होता.मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूरच्या पुढे भानवसे वस्तीजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास ते पोहोचले होते. या दरम्यान पंढरपूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोची कारला समोरून जोरात धडक बसली.
दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण…
हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. टेम्पोचीही समोरून मोठी मोडतोड झाल्याचे दिसून आले. कारमधून प्रवास करणारे रोहित आणि ऋतुजा हे भाऊ-बहीण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडल्यावर शेजारी असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोने धडक दिल्यानंतर कारमध्ये दोघेही अडकले होते. त्यानंतर नागरिकांनी त्यांना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
हे पण वाचा
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.
- प्रसूतीसाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती मातेच्या तडफडून मृत्यू; पोटातील बाळही दगावले.
- खळबळजनक! शिक्षक दाम्पत्याने मुलीसह रेल्वे रुळावर झोपून संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव झाले सुन्न.
- नातेवाईकांकडे लग्नासाठी जात असलेल्या होंडा सिटी कारला भरधाव वेगाने येत असलेल्या ऑडी कारने धडक दिल्याने सुरत येथील दाम्पत्य ठार
- घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ जळगाव शहर व तालुका सभा संपन्न