नाशिक :- येथील वासननगर परिसरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे चारही जणांचे मृत्यू एकाच महिन्यात लागोपाठ झाले आहेत.यात पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकच्या वासननगर परिसरात उमा पॅलेस अपार्टमेंट आहे. यात तुषार महाजन हे आपली पत्नी स्वाती, एक मुलगा कार्तिक आणि मुलगी हर्षदा बरोबर राहात होते. तुषार यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वहिनी बरोबरच म्हणजे स्वाती यांच्या बरोबर लग्न करत कुटुंब सांभाळले.
शिवाय दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली. गेल्या महिन्या मुलगी हर्षदाला ताप आला होता. त्या तापाने तिचा मृत्यू झाला. तीच्या मृत्यूचा धक्का आई स्वातीला बसला. मुलीच्या जाण्याचे दुख: तीला सहन झाले नाही. मुलीच्या तेराव्या दिवशीच स्वाती महाजन यांचाही मृत्यू झाला. घरात एका पाठोपाठ झालेल्या दोन मृत्यूने तुषार महाजन आणि त्यांचा मुलगा कार्तिक हादरून गेले होते. ऐवढे मोठे संकट आपल्यावर कसे कोसळे या विवंचनेत ते होते. हे दोघेही एकटे असल्याने तुषार यांचे भाचे हर्षल चौधरी हे नेहमी या दोघांची विचारपूस करण्यासाठी येत होते. त्यांना भेटत होते. त्यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वनही करत होते.
हर्षलने तुषार यांच्या बरोबर संपर्क केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हर्षल यांनी तुषार यांचे घर गाठले. घरा जावून पाहतो तर त्यांच्या समोर तुषार आणि त्यांचा मुलगा कार्तिक हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथेच त्यांना मृत घोषीत करण्यात आले.या दोघांचा मृत्यू नेमका कशा मुळे झाला हे शेवट पर्यंत समजू शकले नाही. मात्र एका महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपुर्ण कुटुंब बघता बघता काळाच्या पडद्या आड गेलं. जिवनाची नवी सुरूवात केलेल्या या कुटुंबाचा शेवट असा होईल असे कुणी स्वप्नातही पाहीले नसेल.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






