
अनुपपूर : मध्यप्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यामधून नात्याला काळीमा फासणारी एक घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्या दीड वर्षीय मुलाची गळा दाबन हत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आरोपी मातेने आपला गुन्हा कबूल केला असून तिला अटक करण्यात आले आहे.
अॅडिशनल एसपी अभिषेक राजननी सांगितले की, संजीत पंडित बिजुरी छत्तीसगड मध्ये ठेकेदारीचे काम करतात. त्यांची पत्नी पुष्पा आणि दोन मुलं अनुपपूरमध्ये राहतात. दोघांमध्ये त्यांचा लहान मुलगा अविनाशवरुन कायम वाद होत होते. पति संजीतला पुष्पाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने लहान मुलगा अविनाशला आपलं मुल कधीच मानले नाही. त्याच्यावरुन त्यांच्यात कायम भांडणं होत होती. अखेर संजीतने पुष्पाला तिच्या माहेरी सोडले होते. तसेच घरी यायचे असल्यास लहान मुलाची डिएनए टेस्ट केल्यावरच यायचे असे बजावले होते. सततच्या भांडणांना कंटाळून अखेर पुष्पाने रागाच्या भरात रात्री 11 वाजता अविनाशचा गळा दाबून हत्या केली.
रात्री मुलाला बेशुद्धावस्थेत पाहिल्यावर संजीतने रुग्णालयात धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आई-वडिलांवर संशय व्यक्त करत त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता आईने मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.