पुणे : अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केल्यामुळे त्यांना पाण्यात जिवंत फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे.याप्रकरणी आरोपीला आंबी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.महिलेची हत्या घडली. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
गजेंद्र दगडखैर याचे आणि मृत महिलेचे अनैतिक संबंध होते. महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात नेले होते. मात्र गर्भपातावेळी तिचा मृत्यू झाल्याने आरोपींनी तिचा मृतदेह नदीत फेकला. महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडा ओरड केल्यामुळे त्यांनाही नदीत फेकून दिले.अनैतिक संबंधातून २५ वर्षीय महिला गर्भवती राहिल्याचे समजताच तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, गर्भपातावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनीही ही बाब लपवून ठेवली आणि तिचा मृतदेह रविकांत भानुदास गायकवाड व एका महिलेच्या ताब्यात दिला.
त्यानंतर गजेंद्र जगन्नाथ दगडखैर आणि रविकांत यांनी महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो नदीत फेकून दिला.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाड याच्या सोबतीने मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. या दोन लहान मुलांमुळे आपलं बिंग फुटेल, या भीतीने दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं.
दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असे वावरू लागले.प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्याने, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचे आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचे तपासात समोर आले. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- विकास हेच माझे ध्येय…. अपक्ष उमेदवार भगवानभाऊ पाटील (महाजन)
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढता प्रतिसाद बघून विरोधक चिंतेत; यावेळेस मतदार संघात बदल होणार?
- Viral Video :’तरुणाची दाढी काढा,अन् प्रेम वाचवा’ तरुणींनी काढली रॅली,पाहा हास्यास्पद व्हायरल व्हिडिओ.
- ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे कर्जात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल;जे घडल ते भयंकर.
- भुसावळात २५ वर्षीय महिलेच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून खून; संशयीत पतीस मनमाड रेल्वे स्थानकावर अटक.