अकोला :- शहरातील एका प्रख्यात संस्थेच्या वसतीगृहात एका १४ वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली.याप्रकरणी सिव्हील लाईन्स पोलीसांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे.या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १४ वर्षीय मुलीला एका युवकाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी मोठी उमरी भागातील रहिवाशी असलेल्या मुलीच्या आईने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला कलम ३६३ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी ही मुलगी घरी परतली. मुलीने तीच्यावर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची आपबिती सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तत्काळ आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
त्यानुसार १४ वर्षीय मुलीला अनुरागने दुचाकीवर बसवून अकोला शहरातील रामदास पेठ हद्दीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले. त्या ठिकाणी आरोपी अनुराग मनोहर चौधरी (२०) रा. यावल जि. जळगाव, दीपक विठ्ठल मडावी, (२५) रा. सिंधी कॅम्प अकोला तसेच अंकुश विलास वक्टे, (२५) रा. कौलखेड अकोला यांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
महिला अधिकाऱ्यांनी नोंदवले बयाण
याप्रकरणात सदर मुलीचे बयान सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले. त्याने तीने घटनाक्रम सांगितला. त्यातून प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी कलम ३७६, ३७६ दोन एल, ३७६ तीन, ३७६ आय, ३७६ डी.ए., ३,४,६,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.
- सराफाला ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून लुटले, 3 लाख नेल्याची पोलिसात फिर्याद, पोलिसांनी 7 चोरट्यांना पकडले अन् त्यांच्या कडून जप्त केले 2.5 कोटी.
- 55 वर्षीय नराधम उपसरपंचाने केलेल्या अत्याचारानंतर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती प्रकरण दाबण्यासाठी केले धक्कादायक कृत्य.
- साखरपुड्यात नवरीने प्रियकराला मारली मिठी, नवरदेवाने लग्नाला दिला नकार नवरीची धमकी “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”,ITअधिकारी असलेल्या नवरदेवाने संपवलं जीवन
- धरणगाव तालुक्यात वडिलांच्या खुनाचा राग मनात धरून सिनेस्टाईल पाठलाग करून कपाळाच्या मधोमध गोळी झाडून केली हत्या.