Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लहान मुलांपासून वृ्द्ध लोकांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर आवडीने डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ एका कॉलेजच्या कार्यक्रमातील आहे पण व्हिडीओमध्ये विद्यार्थी नाही तर चक्क एक महिला शिक्षिका डान्स करताना दिसत आहेत. या शिक्षिकेचा डान्स पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
महिला शिक्षिकेनी केला जबरदस्त डान्स
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल. या स्टेजवर तुम्हाला काही विद्यार्थीनी आणि काही महिला शिक्षिका डान्स करताना दिसेल पण एक महिला शिक्षिका त्यांच्या डान्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की साडी नेसलेली महिला शिक्षिका अप्रतिम अशा डान्स स्टेप्स करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. काला चश्मा या लोकप्रिय गाण्यावर ही महिला शिक्षिका डान्स करताना दिसत आहे. तिच्याबरोबर इतर महिला शिक्षिका आणि विद्यार्थी सुद्धा डान्स करताना दिसतात.
सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.thejjjjj_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘आम्हाला काही बिनधास्त शिक्षक भेटले.’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘शिक्षिकेने चुकीचे प्रोफेशनल निवडले.’ तर एका युजरने लिहिलेय, ‘तिने शो गाजवला.’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘शिक्षक आज आमच्यापेक्षा जास्त कुल होते’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सना शिक्षिकेचा डान्स आवडला असून काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.या महिला शिक्षिकेचे नाव अरूणिमा देवाशीष आहे. ती प्रोफेशनल डान्सर असून कॉलेजमध्ये शिक्षिका सुद्धा आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.
हे पण वाचा
- सोन्याच्या तस्करीचे हाय प्रोफाईल रॅकेटच्या पर्दाफाश!१४.८ किलो सोन्यासह विमानतळावरून अभिनेत्रीला अटक, बाप IPS अधिकारी
- आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० फायनल: इंडिया मास्टर्सचा दमदार विजय, वेस्ट इंडिज मास्टर्सचा ६ विकेट्सने पराभव
- आजचे राशी भविष्य सोमवार दि.१७ मार्च २०२५
- लहान भाऊ,प्रेयसी आजी, काका,काकु कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; स्वतः विष पिऊन 23 वर्षीय तरुण पोलीस स्टेशनमध्ये हजर ‘ना पश्चात्ताप,ना डोळ्यात अश्रू’..
- संतापजनक! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील वारले, आई लेकीला सोडून गेली २लाखात आजी-आजोबांनी विकलं,लैंगिक त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाणे गाठले.