बक्सर (बिहार) :- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने त्यांच्या पोलीस कॉन्स्टेबल पत्नीची हत्या करून त्यासोबत दोन मुले आणि सासूचा गळा दाबून स्वतःला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील नीतू आणि आरा जिल्ह्यातील पंकजची मैत्री एका मॉलमध्ये नोकरी करताना झाली होती. पुढे जाऊन या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
त्यात नीतूने बिहार पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी केली. २०१५ ला तिला यश मिळालं. कॉन्स्टेबल बनल्यानंतर २०१९ मध्ये नीतूने जानेवारीत पंकजसोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांना २ मुले झाली. सुरुवातीला नीतूची पोस्टिंग नवगछिया इथं होती. त्यानंतर भागलपूर एसएसपी कार्यालयात बदली झाली.अनैतिक संबंधांवरून पंकज आणि नीतू यांच्यात भांडण होऊ लागली. नीतूचे अन्य पुरुषाशी संबंध आहेत असं पंकजला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वाद सुरू झाले.
अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून पंकजने आत्महत्येपूर्वी पत्नी, २ मुले आणि सासूचा खून केल्याचे कबुल केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






