मयूरभंज (ओडिशा) :- ख्रिश्चन मिशनरी सामान्यतः आदिवासी लोकांना लक्ष्य करून त्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरीत करण्याचा प्रयत्न करतात. ओडिशातून अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात एका आदिवासी महिलेला तिचा आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे. धर्मांतरानंतर, तिला औषधे आणि वैद्यकीय उपचार देण्याऐवजी सकाळी आणि संध्याकाळी चर्चमध्ये प्रार्थना करण्यास भाग पाडले गेले. त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासींमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी धर्मांतरावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, ओडिशाच्या आदिवासी बहुल मयूरभंज जिल्ह्यातील बामनघाटी उपविभागाअंतर्गत बिशोई पोलीस स्टेशन क्षेत्रातील केशम गावात अशी घटना उघडकीस आली आहे. या गावातील पिंकी जमुदा (३६) ही महिला किडनीच्या आजाराने त्रस्त होती. तीन मुलांची आई असलेल्या पिंकीच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. महिलेची प्रकृती बिघडल्याचे कळल्यामुळे ख्रिश्चन मिशनरी तिच्या घरी आले आणि तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तिला आश्वासन दिले की जर तिने तिची मूळ संस्कृती सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ती या आजारातून बरी होईल.या ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या जाळ्यात अडकून पिंकी जमुदाने धर्मांतर केले.
त्यांच्या सल्ल्यानुसार पिंकीने औषधे घेणे आणि वैद्यकीय उपचार घेणे बंद केले. पिंकी जमुदा हिला सकाळी आणि संध्याकाळी ख्रिश्चन प्रार्थना करायला लावली होती. तिची प्रकृती आणखी बिघडल्यावर तिला गावाजवळील चर्चमध्ये ठेवण्यात आले. तिची तब्येत सुधारली नाही तेव्हा नववीत शिकणारी तिची मुलगी सीता हिने आईला जवळच्याच मांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून डॉक्टरांनी तिला मयूरभंज जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बारीपाडा येथील पंडित रघुनाथ मुर्मू वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवले. सीता मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली असता डॉक्टरांनी पिंकी जमुदाला मृत घोषित केले.या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी ही बाब गांभीर्याने घेत धर्मांतराच्या कामांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. धर्मांतराच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. “या भागात चर्चची स्थापना झाल्यापासून ख्रिस्ती मिशनरी फिरत आहेत आणि साध्या गरीब आदिवासी लोकांना लक्ष्य करत आहेत. याकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष द्यावे. पिंकी जमुदाचे काय झाले याची सखोल चौकशी व्हायला हवी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासन व प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. हे थांबवले नाही तर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अशा कृत्यामुळे आणखी कोणाचा जीव जाऊ शकतो.’, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४