Viral Video: पुणे :- हडपसर भागात तरुणीचा हात सोडून बाईक चालवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. रिल बनवण्याच्या नादात तरुणीकडून हा जीवघेणा स्टंट करण्यात आल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल झालाय.हा व्हिडिओ पाहून पोलीस कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.पुण्यातील हडपसर भागातून एका तरुणी यामाहा गाडी हात सोडून चालवल्याचा अजब प्रकार करत आहे.
आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा या गाण्यावर तरुणी रिल्स करत हा जीवघेणा प्रकार करतीये. पिंपरी भागातूनही याआधी चालत्या कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला शिक्षाही सुनावण्यात आली होती. आता पुन्हा हडपसर भागातून या तरुणीचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पोलीस कारवाई करणार का? याकडे समाजाचे लक्ष लागून आहे.पुण्यात मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. तरुण तरुणींना काहीही चूक नसतानाही जीव गमावावा लागतोय.
शहरात सर्वत्र वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसतीये. पोर्शे अपघातानंतर तशाच प्रकारे उडवण्याच्या घटना पुणे, पिंपरी शहरात घडू लागल्या आहेत. अजूनही तरुण बाईकवरून रात्री फिरताना नियमांचे पालन करत नाहीत. कशाही प्रकारे वेडीवाकडी वाहने चालवून स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशातच जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय. तरुण तरुणींनी असे जीवघेणे स्टंट करू नये. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
हे पण वाचा
- विकास हेच माझे ध्येय…. अपक्ष उमेदवार भगवानभाऊ पाटील (महाजन)
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढता प्रतिसाद बघून विरोधक चिंतेत; यावेळेस मतदार संघात बदल होणार?
- Viral Video :’तरुणाची दाढी काढा,अन् प्रेम वाचवा’ तरुणींनी काढली रॅली,पाहा हास्यास्पद व्हायरल व्हिडिओ.
- ऑनलाईन गेम्सच्या व्यसनामुळे कर्जात बुडालेल्या पोलीस अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल;जे घडल ते भयंकर.
- भुसावळात २५ वर्षीय महिलेच्या डोक्यात रॉडसदृश वस्तू मारून खून; संशयीत पतीस मनमाड रेल्वे स्थानकावर अटक.