परभणी : परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद विकोपाला जाऊन पतीने आपल्या पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीवर औताच्या पासने वार करत तिची हत्या केली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीवरून, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने औताच्या पासने तिच्या शरीरावर सपासप वार केले आहे. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. हृदय पिळवून टाकणारी ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या करवली येथे घडली आहे. ज्योती गिरी असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश गिरी याला ताब्यात घेतलं आहे.
वाद इतका टोकाला, औताच्या पासने पत्नीवर वार….
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्योती आपल्या दोन मुलांसह शेतआखाड्यावर राहत होती. आरोपी सतीश गिरी याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. गुरुवारी ज्योती आणि सतीशमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद इतका टोकाला गेला, की सतीशने औताच्या लोखंडी पासने ज्योतीवर हल्ला केला.यामध्ये ज्योतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सतीशने ज्योतीची हत्या केलीची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पंचनामा केल्यानंतर बोरी पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी आरोपी सतीश याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !