नंदुरबार – तालुक्यातील रनाळा येथे नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या म्हशी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.रनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी दगा धात्रक यांची दोघे मुले म्हशी चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होते. दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या.
बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना. यामुळे विकी (२२) हा म्हशींना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याचे त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर (२५) याच्या लक्षात आल्याने तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाले. सदरची बाब काठावर बसलेल्या तिघा लहान मुलींच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करुन परिसरातील नागरिकांना माहिती दिली.
त्यानंतर लगेचच लगतच्या शेतातील शेतकरी व मजूर मदतीसाठी धावले. परंतु, तोपर्यंत दोघे जण पाण्यात बुडाले होते. परिसरातील काहींनी पाण्यात उड्या घेत त्यांचा शोध घेतला. तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.ज्ञानेश्वरचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला असल्याचे समजते. दरम्यान, दोघांचे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.
हे पण वाचा
- धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा…. महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार
- जन्मदात्या आईच्या मृतदेह समोरून गेला सरणावर, 8 मुली 1मुलगा पैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना, पण जमिनीच्या वाटणीला मात्र…..
- Viral Video: घराच्या छतावर पती पत्नीचे भांडण गेले टोकाला; पत्नीने थेट पतीला छतावरूनच खाली फेकले, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पती होता अनैतिक संबंधात अडसर बायकोने रचला डाव पलंगावर झोपलेल्या नवऱ्यावर वार करून केली हत्या,पोलिसांनी तीन तासात पत्नी व प्रियकराला केली अटक.
- पत्नीच्या आई वडिलांकडून 25 तोळे सोने व 75 लाख रुपये घेऊनही पत्नीस शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तहसिलदार पतीला अटक.